RTMNU Academic Calendar 2025-26 PDF
RTMNU Academic Calendar 2025-26: Important Update For RTMNU Students!! Academic Calendar Changes for the 2025-26 Session. The RTMN University has issued a new circular concerning updates to the previously released RTMNU academic calendar for the 2025-26 academic session. You can download the Rtmnu academic calendar pdf from this page. This Nagpur University calendar is relevant to both managed/affiliated colleges and the University’s autonomous departments. Originally announced under Notification on April 17, 2025, the calendar indicated that the second term of the session was to conclude on April 15, 2026. For further details regarding the changes, please refer to the Nagpur University Academic calendar 2026 circular linked below for BA, Bcom, BSC, BCA, BCCA, BE, Btech. All concerned parties are encouraged to stay informed about the adjustments made to the Nagpur Vidyapeeth academic schedule 2026.
मित्रांनो, याआधी विद्यापीठाद्वारे शैक्षणिक वेळापत्रक जाहीर केले होते. परंतु, त्यात काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. या संदर्भातील नवीन परिपत्रक जाहीर झाले आहे. खाली या संदर्भात माहिती आपण बघू शकता. या नुसार, सर्व संबंधितांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की, शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी संचालित/संलग्नित महाविद्यालये तसेच स्वायत्त विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांसाठी शैक्षणिक वेळापत्रक अधिसूचना क्रमांक Acad./Acad.Cale./2025/235 व 236, दिनांक १७ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार सत्रातील द्वितीय कालावधी समाप्तीची तारीख १५ एप्रिल २०२६ निश्चित करण्यात आली होती. अधिक माहिती आपण खालील परिपत्रकात बघू शकता.

तसेच, नवीन माहिती नुसार, शैक्षणिक वेळापत्रक समितीच्या ५ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत हा कालावधी १५ एप्रिल २०२६ ऐवजी ३० एप्रिल २०२६ पर्यंत वाढविण्याची शिफारस करण्यात आली. तसेच, उन्हाळी सुट्ट्या १ मे ते १५ जून २०२६ या कालावधीत ठेवून नवीन शैक्षणिक सत्र १६ जून २०२६ पासून सुरू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. या शिफारसीस दिनांक १० मार्च २०२६ रोजी झालेल्या विद्यापरिषद सभेत (विषय क्र. ७४) मान्यता देण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने, वरील अधिसूचनेत आवश्यक दुरुस्ती करण्यात येत असून सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे राहील:
| घटक | कालावधी |
|---|---|
| Second Term (Even Semester & Annual Pattern) संचालित/संलग्नित महाविद्यालये | 10 नोव्हेंबर 2025 ते 30 एप्रिल 2026 |
| उन्हाळी सुट्ट्या (Summer Vacation) | 01 मे 2026 ते 15 जून 2026 |
| स्वायत्त विद्यापीठ शैक्षणिक विभाग (Summer Vacation) | 01 मे 2026 ते 15 जून 2026 |
| नवीन शैक्षणिक सत्र सुरू | 16 जून 2026 पासून |
संचालित/संलग्नित महाविद्यालये (Second Term – Even Semester & Annual Pattern):
१० नोव्हेंबर २०२५ ते ३० एप्रिल २०२६
उन्हाळी सुट्ट्या (सर्वांसाठी):
१ मे २०२६ ते १५ जून २०२६
स्वायत्त विद्यापीठ शैक्षणिक विभाग (Summer Vacation):
१ मे २०२६ ते १५ जून २०२६ सदर दुरुस्तीची नोंद घ्यावी, ही विनंती.
